जागतीक महिला दिना निमित्त स्त्री शक्तीपीठ पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे अवाहन


जळगाव - जागतीक महिला दिना निमित्त नजर फाऊडेंशन व बी. एम.फाऊडेंशन यांच्या संयुक्त विद्यामानाने जळगाव जिल्ह्यातील विविध क्षेत्रात सेवा देवुन नाव लौकीक मिळविलेल्या महिलांना "स्त्री शक्तीपीठ" पुरस्कार देण्यात येणार असुन त्यासाठी साधा अर्ज करून प्रस्ताव पाठवण्याचे अवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
या बाबत सविस्तर असे की, जळगाव जिल्ह्यातील सामाजीक, राजकीय,सांस्कृतीक,चॅरिटेबल,शासकीय नोकरी,खाजगी व्यवसायात अशा विविध क्षेत्रात काम करून समाजात ठसा उमटविणार्या महिलांनी या पुरस्कारा साठी अर्ज करावा.प्रस्ताव साधा अर्जावर करावा.सोबत आधार कार्ड,पासपोर्ट फोटो,केलेल्या कामांचा आढावा म्हणुन संक्षीप्त माहीती अर्जात नमुद करावे.तसेच केलेल्या कांमाचा वर्तमान पत्रातुन प्रसिध्दीची कात्रणे सोबत जोडणे आवश्यक आहे.सदर प्रस्ताव संस्थेचे कार्यालय ५२ डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्केट,जळगाव येथे पाठविण्यात यावे.अधिक माहीतीसाठी मो.९३७०६५३१०० या क्रमांकावर संपर्क करावा असे अवाहन बी.एम. फाऊडेंशन च्या अध्यक्षा सौ.शुभांगी बिर्हाडे, नजर फाऊडेंशन चे सचिव दिपक सपकाळे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post