मूर्तीजापुर:- स्थानिक शहरात उन्हाळयाची चाहुल लागताच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शहरातील विविध प्रभागातील जनतेला नाही निदान पिण्याचे पाणी मिळावे यासाठी प्रभाग क्रमांक सहामधे तातडीने पाईप लाईन टाकण्यात यावी अशी मागणी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक दारकाप्रसाद दुबे यांनी जिल्हा अधिकारी अकोला याना एक निवेदन सादर करून दि.24 फेब्रुवारी रोजी केली आहे. मूर्तीजापुर नगर परिषदेत सध्याचे स्थितीत जिवन प्राधिकरणाचे काम मागील ७ वर्षा पासुन सुरू आहे. हे काम ९५/- पुर्ण झाले आहे. तरी प्रभाग क्रमांक ६ मध्ये जिवन प्राधिकरणाची लहाने नामक कंत्राटदाराने मंजूर करण्यात आलेली पाईप लाईन अधापही टाकली नाही. वारंवार सांगून ही कंत्राटदार पाईप लाईनचे काम सुरू करण्यास उडवाउडवीची उत्तरे देवुन टोलवाटोलवी करीत आहे. म्हणून प्रभाग क्रमांक सहामधील ( १) बडनेरकर यांचे घरापासून ते आंबेकर गूरूजी यांच्या घरापर्यंत,( २)सुनील लशुवाणी यांचे दिलीय देशपांडे यांच्या घरापर्यंत,( ३)हनुमान मंदिर ते आशीष झाला यांच्या घरापर्यंत,( ४)डॉ. किशोर कडू यांच्या घरापासून ते संजय अग्रवाल यांच्या घरापर्यंत,(५)गवारे यांच्या घरापासून ते जोशी यांच्या घरापर्यंत,( ६) पंचशील वाडी ते जुनी वस्ती मातंगपुरा,(७)विनोद बंग यांच्या घरापासून ते जुनी नगर परिषद प्रवेशद्वारा पर्यंत पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या नकाशात पाईप लाईन मंजूर असून ही प्रभाग क्रमांक सहा मध्ये एकाही ठिकाणची पाईप लाईन टाकण्यात आली नाही. हा भाग जुनी वस्तीचा असुन या भागावर एका प्रकारे अन्याय झाला असून हा पाण्यापासुन वंचित ठेवण्याचा प्रकार आहे. तरी नगरपालिका प्रशासनाला व जिवन प्राधिकरणाचे कंत्राटदारास तातडीने पाईप लाईन टाकण्याचे आदेश देण्यात यावे. अन्यथा या विरोधात तिर्व आंदोलन छेडण्याचा ईशारा देण्यात आला आहे. असे जिल्हाअधिकारी अकोला यांना दिलेल्या निवेदनात नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष दारकाप्रसाद दुबे यांनी म्हटले आहे.
Author: Moeez Shaikh
Related Posts
Some simillar article from this label, you might also like
- Blog Comments
- Facebook Comments
Subscribe to:
Post Comments (Atom)