- फुलकळस येथे इंद्रधनुष्य कला महोत्साव उत्साहत संपन्न
ताडकळस / दि.20 फेब्रुवारी, येथुन जवळच असलेल्या फुलकळस (ता. पुर्णा) येथील महात्मा बसवेश्वर माध्यमिक विद्यालय व कै. संतुकराव शिवणकर विद्यालया च्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलना निमित्त आयोजित इंद्रधनुष्य कला महोत्सावात चिमुकल्या कलाकारांनी सादर केलेल्या कलाविष्काराने उपस्थितांची जोरदार दाद मिळवत मने जिकंली. आकर्षक विद्दुत रोषणाई, बहुरंगी वेशभूषा व चिमकल्या कलाकारांचे नृत्याचे कलाविष्कार व बाल कलाकारांचा वाढता उस्ताह यामुळे कार्यक्रमात उत्तरोत्तर रंगत भरतच गेली.
कार्यक्रमासाठी उपस्थित फुलकळस, ताडकळस, माखणी, खडाळा, मजलपुर व लिमला आदी ठिकाणाच्या पालकांसह उपस्थित रसिक श्वोते कार्यक्रम पाहण्यात दंग होऊन गेले. गणेशस्तुतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. लावणी, मराठी हिंन्दी फिल्मी गीते, शेतकरी व शोर्यगीता वर नृत्य सादर करत बालकांनी आपल्या कलेची चुनुक दाखवली.
कार्यक्रामात छोट्या कलाकारांनी एका पेक्षा एक जोरदार गीते सादर करत एकच धमाल ऊडवून दिली. तर शेतकऱ्यांच्या जिवनावर आधारित लघु नाटीका पाहातांना कार्यक्रमासाठी उपस्थित हजारो लहान मोठे श्रोते श्षणभर स्तब्ध झाले. विद्यार्थ्यांच्या कलेला दाद देत उपस्थितांनी कौतुक केले.
प्रारंभी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष धन्यकुमार शिवणकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उदघाटन झाले यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन संस्थेचे सचिव सुदामराव शिराळे, जिल्हा परिषद सदस्य गणेशराव आंबोरे, आरबीआय मुंबईचे वित्त अधिकारी अमोल किडे, शिवा संघटनेचे सोशल मिडीया जिल्हा प्रमुख जनार्धन खाकरे, परभणी शहर प्रमुख कोडिंबा नावकीकर, खंडोजी शिवणकर, शेख जलील भाई, सरपंच गजानन शिराळे, माजी चेअरमन चक्रधर शिराळे, डिंगाबरराव शिराळे, बालासाहेब भालेराव, बबन शिवणकर, राजु शिवणकर आदीची उपस्थिती होती. आयोजकांच्या वतीने उपस्थित मान्यवरांसह यावेळी वार्ताकंनसाठी उपस्थित पत्रकारांचे शाल श्रीफळ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविक संचालक सुर्यकांत शिवणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षक सचिन महाजन, स्वाती भालेराव, पुजा शिराळे, भाग्यश्री ठाकुर यांनी केले तर आंभार शिक्षिका शिला रोडगे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक गोविंद जामकर व गणेश लासे यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिव देशमुख, धोंगडे मँडम, सावने मँडम, हनुमंत कुबडे, ग्यानबा हरने, मारोती शेकापुरे, परमेश्वर फरकांडे आदीनी परिश्रम घेतले.