निकाह’ अत्यंत साधेपणाने करण्याचे हजरत मौलाना साद यांचे आवाहन


औरंगाबाद :- मागील काही वर्षांपासून मुस्लिम बांधव ‘निकाह’पद्धतीवर अनावश्यक पद्धतीने लाखो रुपये खर्च करीत आहेत. हे अल्लाह आणि प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांना अजिबात अपेक्षित नाही. ‘निकाह’अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने करावा, असे आवाहन रविवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांनी केले. निकाह’अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने करावा, असे आवाहन रविवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांनी केले. ९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती. असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी.‘निकाह’ अत्यंत साधेपणाने करण्याचे हजरत मौलाना साद यांचे आवाहन‘निकाह’अत्यंत साधा आणि सोप्या पद्धतीने करावा, असे आवाहन रविवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये दिल्लीच्या मरकजचे प्रमुख हजरत मौलाना साद साहब यांनी केले.आयुष्यात यशस्वी होण्यामागे साधेपणा खूप आवश्यक आहे.


आपल्या अपत्यांवर कसे संस्कार करणार हे अगोदरच ठरवून घ्या. एकोप्यातील गोष्टी चार जणांसमोर अजिबात सांगू नये, असेही साद साहब यांनी सांगितले. हजरत साद साहब यांचे मार्गदर्शन लाखो साथी बांधव अत्यंत शांतपणाने ऐकत होते. इज्तेमामध्ये दिल्लीहून आलेले हजरत मौलाना साद साहब यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी साथी बांधव आतुर झाले होते. मागील दोन दिवसांमध्ये त्यांनी तीनवेळेस मार्गदर्शन केले. उद्या त्यांच्या नेतृत्वाखालीच दुआ होणार आहे.
ठळक मुद्दे९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती.असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले.यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी. रविवारी सायंकाळी ठीक ५.३० वाजता ‘असर’ची नमाज इज्तेमास्थळी अदा करण्यात आली. ९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती. जिथे जागा मिळेल तिथेच नमाज अदा करण्यात आली. रविवारी या परिसरात कुठेच पाय ठेवायला जागा नव्हती. असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले. यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी. यातच अल्लाह ‘राजी’होऊ शकतात. लग्नकार्य अत्यंत साधेपणाने साजरे करायला हवे. साथींनी दावतच्या कामात आपले अधिक योगदान दिले पाहिजे.

  • ९१ लाख चौरस फुटांच्या मुख्य मंडपाबाहेरही लाखोंच्या संख्येने साथींनी गर्दी केली होती.
  • असरच्या नमाजनंतर हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना मार्गदर्शन केले
  • यावेळी ते पुढे म्हणाले की, प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी आपल्या आयुष्यात येणार्‍या प्रत्येक बारीकसारीक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केलेले आहे. त्यांनी सांगितलेली पद्धतच अवलंब करावी

तीन हजारांच्या आसपास सामूहिक विवाह
औरंगाबाद शहरात यापूर्वी जिल्हानिहाय इज्तेमामध्ये शेकडोंच्या संख्येने सामूहिक विवाह लावण्यात आले आहेत. तीन हजारांच्या आसपास सामूहिक विवाह लागण्याची ही पहिलीच वेळ होती. लाखोंच्या जनसागराच्या साक्षीने लग्न सोहळा होणे हे कधीतरी घडत असते. मुख्य मंडपाच्या परिसरात जिल्हानिहाय लग्न लावण्यात आले

  • राज्यस्तरीय इज्तेमाचा समारोप  देशभरातील राज्यस्तरीय सर्व इज्तेमांचे रेकॉर्ड ब्रेक

औरंगाबाद  देशात ‘अमन भाईचारा’ कायम असावा, सर्वांना गुण्यागोविंदाने ठेव, संपूर्ण मानवकल्याणासाठी निर्णय घे, बळीराजाला कर्जमुक्ती दे, अशा शब्दांत सोमवारी राज्यस्तरीय इज्तेमामध्ये विशेष ‘दुआ’करण्यात आली. हजरत मौलाना साद साहब यांच्या नेतृत्वाखाली उपस्थित अथांग जनसागराने ‘आमीन’ म्हणून संबोधन दिले. ठीक ११.३३ मिनिटाला ‘दुआ’ सुरू झाली. तब्बल ४० मिनिटे ही दुआ सुरू होती. यावेळी उपस्थित लाखो भाविकांनी आपल्या अश्रूंचा बांध मोकळा करून दिला.
देशभरात यापूर्वी झालेल्या सर्व राज्यस्तरीय इज्तेमाचे रेकॉर्ड आज औरंगाबादेत ब्रेक झाले. संयोजकांनी गृहीत धरलेल्या आकड्यापेक्षा कितीतरी जास्त पटींनी साथी लिंबेजळगाव येथे दाखल झाले. मागील तीन दिवसांपासून साथी शहरात दाखल होणे सुरूच होते. सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत लिंबेजळगावच्या मुख्य रस्त्यावर पायी, वाहनांद्वारे येणाºयांची संख्या हजारोंपेक्षा जास्त होती. प्रथम हजरत मौलाना साद साहब यांनी उपस्थित लाखो साथींना तब्बल दीड तास मार्गदर्शन केले. यानंतर लाखो भाविक ज्या क्षणाची आतुरतेने चातकाप्रमाणे वाट पाहत होते तो क्षणही ११.३० वाजता आला.


साद साहब यांनी दुआला सुरुवात केली. संपूर्ण मानव कल्याणासाठी निर्णय घे, या देशात आणि जगभरात ‘अमन’ कायम ठेव. सर्वांना गुण्यागोविंदाने राहू दे. लहरी पावसामुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त झाला असून, चांगला व सर्वदूर पाऊस दे. आमचे सर्व गुन्हे पदरात घे... इज्तेमासाठी ज्यांनी कठोर मेहनत घेतली त्यांना ‘बरकत’ द्यावी. त्यांच्या घरी लक्ष्मी नांदू दे. ज्यांनी इज्तेमासाठी जमिनी दिल्या, सढळ हाताने मदत केली, त्यांचाही उद्धार कर, अशा शब्दांत दुआला सुरुवात झाली. त्यानंतर भाविकांसह मौलाना साद यांच्याही अश्रूंचा बांध फुटला. इज्तेमास्थळी उपस्थित लाखो भाविकांचे डोळे चिंब झाले होते.दुआ संपल्यावर साथींनी इज्तेमा स्थळापासून कसे निघावे यावरही मार्गदर्शन करण्यात आले. सर्वप्रथम दुचाकी वाहनधारक बाहेर पडतील. त्यानंतर चारचाकी वाहनधारक एका तासानंतर पार्किंग स्थळातून बाहेर काढण्यात येतील. बस आणि ट्रक त्यानंतर निघणार असून, साथींनी निघण्याची अजिबात गडबड करू नये, असे आवाहन करण्यात आले.सोमवारी दुपारी सामूहिक ‘दुआ’ झाल्यानंतर इज्तेमाची सांगता करण्यात आली. त्यानंतर औरंगाबाद-नगर महामार्गावर लाखोंच्या संख्येने साथी घराकडे जाण्यासाठी निघाले होते. पायी जाणाºया साथींसाठी लिंबेजळगाव, वाळूज, कमळापूर, रांजणगाव, साजापूर, पंढरपूर आदी ठिकाणी हिंदू-मुस्लिम बांधवांनी खिचडी, पोहे, थंडपेय, चहा आदींची व्यवस्था केली होती. या आदरातिथ्यामुळे मुस्लिम बांधव भारावून गेले होते. याशिवाय महामार्गावरील हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप आदी ठिकाणी भाविकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती

रात्री उशिरापर्यंत साथींची रांग
लिंबेजळगावहून दुपारी १ ते ३ या वेळेत साथी बाहेर पडले. पायी चालत जाण्यासाठी त्यांना रात्री ८ वाजले. अनेक जण रात्री १० वाजेपर्यंत पायीच जात होते. लाखोंच्या संख्येने शहरात दाखल झालेल्या साथींसाठी त्वरित बसेस आणि रेल्वे उपलब्ध नव्हत्या. त्यामुळे रेल्वेस्टेशनवर साथींची अलोट गर्दी झाली होती.महिला-मुलींना शिक्षण द्या- मौ. सादसाहब वाळूज महानगर : महिला व मुली शिक्षित झाल्यास नवीन पिढीवर चांगले संस्कार घडतील. इस्लाम धर्म अमन-शांतीचा ‘पैगाम’ देतो. अल्लाह आणि प्रेषित हजरत मोहंमद पैगंबर यांनी संपूर्ण जगाला दाखविलेल्या मार्गाप्रमाणे जीवन जगावे. जगाचे किंवा ‘दीन’चे काम असेल, तर चांगल्या कामासाठी सतत पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत दिल्लीच्या मरकजचे प्रमुख मौलाना सादसाहब यांनी व्यक्त केले. त्यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी राज्यस्तरीय इज्तेमात ‘दुआ’ करण्यात आली. समारोपाच्या दिवशी मौलाना उपस्थित अथांग जनसागराला काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.


त्यांनी ‘रवानगी आणि दुआ’ या सत्रात मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, प्रत्येक घरात पवित्र ‘कुरआन’ची तालीम करण्याची गरज आहे. जीवन कसे जगावे, याविषयी कुरआनमध्ये उल्लेख आहे. प्रत्येक स्त्री-पुरुषाला ‘कुरआन’ची तालीम देण्याची आज गरज आहे. 
घरातील पुरुष मंडळींना मशीद, इज्तेमा, जमाअत तसेच इतर ठिकाणी इस्लामची माहिती मिळत असते. मात्र, महिला आणि विशेषत: मुलींना ‘दीन’ची माहिती मिळत नसल्यामुळे महिलांसाठी स्वतंत्र ‘जमात’ काढण्यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. घरातील महिला शिक्षित झाल्यावर नवीन पिढीवर चांगले संस्कार घडतील. यासाठी प्रत्येकाने महिला शिक्षणावर अधिक भर देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी नमूद केले. अल्लाह सर्वांना हिदायत (प्रेरणा) देणारा असून, तोच या संपूर्ण जगाचा पालनहार आहे. सर्वांना चांगले शिक्षण देऊन त्यांना अंधारमय अज्ञानातून बाहेर काढण्याची गरज आहे. मुस्लिम बांधवांनी सदैव अल्लाहचा ‘जिक्र’ करीत राहावे, असा सल्लाही त्यांनी दिला. ‘कुरआन’ची तिलावत व शिक्षणामुळे जगातील चांगल्या आणि वाईट गोष्टींची माहिती होते. प्रेषितांनी ‘दीन’ आपल्यापर्यंत पोहोचविण्याचे काम केले. समाजाला चांगली दिशा दाखविण्यासाठी कुणीही अल्लाहचा दूत येणार नसल्याने प्रेषितांनी दाखविलेल्या ‘नेकी’च्या मार्गावरून जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले

  • इज्तेमासाठी आलेल्या साडेआठ लाख वाहनांचा शिस्तीत प्रवास

औरंगाबाद : लिंबेजळगाव येथील तीनदिवसीय इज्तेमाचा सोमवारी दुपारी समारोप झाल्यानंतर तेथे आलेले लाखो साथी आणि सुमारे साडेतीन लाख चारचाकी आणि पाच लाख दुचाकी वाहने शिस्तीत परतीच्या प्रवासाला निघाली. विशेष म्हणजे रेल्वे आणि बसने जाणाºया साथींसाठी प्राधान्य देत एक मार्ग मोकळा ठेवल्याने त्यांचा प्रवासही सुकर झाला.इज्तेमासाठी देशभरातून लाखो साथी सुमारे साडेतीन ते चार लाख चारचाकी वाहने आणि पाच लाख दुचाकींनी आले होते. यातील हजारो वाहने इज्तेमाच्या आठ ते दहा दिवस आधी, तर काही वाहने इज्तेमाच्या आदल्या दिवशी आणि उर्वरित वाहने इज्तेमादरम्यान तेथे दाखल झाली होती.वेगवेगळ्या दिवशी दाखल झालेली ही सर्व वाहने एकाच दिवशी परतीच्या प्रवासाला निघणार असल्यामुळे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता लक्षात घेऊन संयोजक आणि वाहतूक बंदोबस्तावरील अधिकाºयांनी नियोजनबद्ध वाहने सोडण्याचा निर्णय घेतला. रेल्वे आणि एस.टी. महामंडळाच्या बसेस, ट्रॅव्हल्स बसेसने परत जाणाºया नागरिकांसाठी लिंबेजळगाव ते नगर नाका, महावीर चौकापर्यंत पादचारी मार्ग म्हणून खुला ठेवण्यात आला, तर दुसºया मार्गावरून दुचाकी आणि कार सोडण्यात आल्या. मात्र, पादचाºयांची संख्या खूप जास्त असल्याने पादचाºयांनी कार आणि दुचाकींचा रस्ताही व्यापला होता.


मात्र, पादचाºयांना प्राधान्य असल्याने वाहनचालकांनी त्यांना पुढे जाऊ दिले.
दुपारी सुरू झालेला पादचाºयांचा प्रवास रात्री उशिरापर्यंत सुरू होता. महावीर चौकातून पादचारी रेल्वेस्टेशन, मध्यवर्ती बसस्थानक, सिडको बसस्थानक येथे गेले.रात्रभर वाहने रस्त्यावर हजारो नागरिक ट्रकने आले होते. हे ट्रक इज्तेमाच्या वाहन पार्किंगमध्ये होते. रेल्वे, बसने जाणाºया साथींची संख्या कमी झाल्यानंतर अन्य वाहने सोडण्यात आली. आधी पायी जाणारे साथी, त्यानंतर दुचाकी, त्यानंतर कार आणि सर्वात शेवटी ट्रक आणि खाजगी बसेस सोडण्याचा निर्णय संयोजकांनी घेतला.

  • तीन महिन्यांपासून सुरू होती तयारी


गेल्या तीन महिन्यांपासून राज्यस्तरीय इज्तेमाची तयारी जिल्हा कमिटीच्या वतीने केली जात होती. त्यासाठी तब्बल २ हजार २०० एकर जागेचे सपाटीकरण केले गेले.पाण्याच्या सुविधेसाठी २२ शेततळी खोदून त्यात कोट्यवधी लिटर पाणी साठवले गेले. मांढरादेवी यात्रेत आगीची घटना घडली होती. त्यात अनेक भाविकांचा मृत्यू झाला होता. अशी संभाव्य दुर्घटना लक्षात घेऊन ही दक्षता बाळगण्यात आली. इज्तेमास्थळी चहूबाजूने चार इंची पाण्याची पाइपलाइनही टाकण्यात आली. त्यावर पंप बसवण्यात आला.रविवारी दिवसभर कार्यक्रमांना हजेरी लावून जोहर, असर, मगरीबची नमाज अदा करून साथी घरी परतत आहेत. अनेकांनी इशाची नमाज झाल्यावर इज्तेमा कार्यक्रमातून परतणे पसंत केले 


  • वरिष्ठ पोलीस अधिकारी रात्रंदिवस ड्यूटीवर
पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक बंदोबस्तासाठी पोलीस उपायुक्त डॉ. दीपाली धाटे, उपायुक्त विनायक ढाकणे यांच्यासह तीन उपायुक्त, सहायक आयुक्त सी.डी. शेवगण यांच्यासह आठ सहायक आयुक्त, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, रामेश्वर रोडगे, मनोज पगारे यांच्यासह १४ पोलीस निरीक्षक, ८२ पोलीस उपनिरीक्षक आणि १ हजार ३०० वाहतूक पोलीस तैनात होते. त्यांच्या मदतीला स्वयंसेवक पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून कर्तव्य बजावत होते.



SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post