मुंबई दि. 25 - भारतीय सिनेविश्वात बालवयापासून आपल्या अभिनयाचा चमक दाखविणारी अभिनयाच्या आकाशात चमकणारी चांदणी ठरलेल्या अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अकाली निधनाने भारतीय सिनेसृष्टीने सदाबहार गुणी अभिनयसम्राज्ञी गमावली आहे. आशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांना आदरांजली वाहिली आहे.सदाबहार अभिनेत्री श्रीदेवी यांच्या अचानक निधनाच्या वृत्ताने सिनेरसिकांना सदमा बसला आहे. श्रीदेवी यांचे भारतीय चित्रपट क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे.त्यांच्या कर्तृत्वाचा भारत सरकारने पद्मश्री किताबाने गौरव केला आहे. विविध प्रादेशिक भाषांसह हिंदी सिनेमात त्यांनी केलेल्या अभिनयाचा ठसा सिनेरसिकांच्या मनात कायम बिंबला गेला आहे. अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी यांनी चांदणी ; सदमा ; नगिना आदी अनेक सिनेमात केलेल्या विविध भूमिका सिनेरसिकांच्या कायम मनात कोरल्या गेल्या आहेत. श्रीदेवी यांच्या निधनाने भारतीय सीनेसृष्टीची कधीही भरून येणार नाही अशी अपरिमित हानी झाली आहे अशी शोकभावना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे.
अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली निधनाने भारतीय सीनेसृष्टीची सम्राज्ञी हरपली - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले