(श्री.गाडगे महाराज महाविद्यालयात कलावेध महोत्सवाचेेेे उदघाटन)
मुर्तिजापूर ( प्रतिनिधी ) पूर्वी महाविद्यालयामध्ये स्नेहसंमेलन व्हायचे त्यामागे विविध जाती, धर्माच्या विद्यार्थ्यांना एकत्र आणून त्यांच्यामध्ये धर्म - जाती सलोखा निर्माण करणे हा हेतू होता. आता आपण सामाजिक समतेच्या दृृष्टीने एकामेंकाजवळ आलो आहोत. म्हणून यापुढे विद्याथ्र्यामधील स्पर्धेच्या माध्यमातून टॅलेन्ट शोधले पाहिजे. विद्याथ्र्यांनी परीश्रम करून कलेला सादर करावे. पुढे हीच कला व्यक्तिमत्व घडण्यासाठी उपयुक्त ठरते असे महाविद्यालयीन विद्यार्थांना संंबोधित करताना माजी आमदार भैैैैय्यासाहेब तिडके यांनी प्रतिपादन केले. कलावेेेध महोत्सवात उदघाटक म्हणून तेे बोलत होते. भैैैैय्या साहेबांनी खुमासदार शैलीत भाषण देवून विद्याथ्र्यांची व श्रोतुवृदांची मने जिंकली. व्यासपीठावर प्राचार्य संतोष ठाकरे,पत्रकार विलास नसलेे प्रा.गोपाल उपाध्ये,प्रा.दिपक कोल्हे , प्रा.मनिषा यादव यांची उपस्थिती होती. प्राचार्य संतोष ठाकरे यांनी चितनशील व वैैैैचारीक मताची मांडणी केेली.
आई-वडील यांच्या खांद्यावरील ओझेे आपल्या खांद्यावर घेेेेण्या एवढे सक्षम बनावे असा आशावाद व्यक्त केला. प्राचार्यांनी महाविद्याल्यामध्ये गाडगेबाबांच्या आवडत्या भजनाचा नवा पायंडा पाडून उदघाटन सोहळयाला नवी सौंदर्यानुभूती दिली .यावेळी पत्रकार विलास नसले यांनीही आपले मौलिक विचार मांडून सकारात्मक दृष्टिकोन ठेवून विद्याथ्र्यांनी आपल्या महाविद्यालयीन जीवनाचे सोने करावे अशी सूचना केली.कार्यक्रमाला खचाखच भरलेला विद्यार्थी समुदाय, प्राध्यापकवर्ग उपस्थित होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, डाॅ. गोपाल उपाध्ये यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा. मनिषा यादव तर आभार प्रा. दिपक कोल्हे यांनी मानले आणि मंत्रमुग्ध करणा-या या कार्यक्रमाची सांगता झाली.