मुर्तिजापूर: स्थानिक प्रसिद्ध साहित्यिक सुनिल ठाकूर यांनी पूणे येथील स्व रकूल ट्रस्टच्या "विनर ऑफ द इयर" या राष्ट्रीय पूरस्कारावर आपले नाव कोरले आहे. त्यांना नुकताच हा पूरस्कार दिग्गजांच्या उपस्थितीत बहाल करण्यात आला. पूणे येथे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर स्वरकुलच्या वतीने " जीवन वर्धिनी दिव्यांग निवासी विद्यालय" दिवे, यांच्या सहयोगासाठी एका रंगारंग कार्यक्रमाचे व राष्ट्रीय पूरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
साहित्य आणि सहकार क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सुनिल ठाकूर यांना विनर ऑफ द इयर हा पूरस्कार महापौर मुक्ताई टिळक, अभिनेत्री ज्योती चांदेकर, अभिनेते शैलेश पितांबरे, निर्माती निलमा लोणारी, चेअरमन जे. बशीर, कलावंत मकरंद टिल्लू या दिग्गजांच्या हस्ते बहाल करण्यात आला. स्मृतिचिन्ह, मानपत्र, रोख बक्षीस असे पूरस्काराचे स्वरुप आहे. गोवा, कर्नाटक, झारखंड, महाराष्ट्र आदी भागातील कर्तृत्ववान व्यक्तीना या पूरस्काराने गौरवांकित करण्यात आले असून ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ .विणा त्यागराज यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.