डॉ प्रा खलील सिद्दीकी यांना आदर्श ग्राम भुषण पुरस्कार


औसा : - पानगाव येथील रहिवासी व अजीम कॉलेज औसा येथे कार्यरत असलेले डॉ प्रा खलीलोदीन खायमोदीन सिद्दीकी यांना त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात पानगाव ग्राम पंचायत कार्यालयाच्या वतीने दिला जाणारा आदर्श ग्राम भुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानचिन्ह, प्रमाणपत्र व गुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.डॉ खलील सिद्दीकी यांनी आकाशवाणी हैदराबाद येथे उध्घोषक काम केले असून उत्कृष्ट उर्दू लेखक म्हणून त्यांना महाराष्ट्र शासनाने दोन वेळेस राज्य पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.. या व्यतिरिक्त आंध्र प्रदेश शासनाने युवा लेखक म्हणून पुरस्कृत केले आहे. डॉ खलील सिद्दीकी यांची दहा पुस्तके प्रकाशित झाली असुन महाराष्ट्र राज्य अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणून ही काम पाहत आहेत. महाराष्ट्र राज्य उर्दू साहित्य परिषदेचे महासचिव म्हणून त्यांची ख्याती आहे..पानगाव येथे संपन्न झालेल्या पुरस्कार सोहळ्यास वरिष्ठ नागरिक श्री व्यंकट अनामे, श्री रशिद सौदागर, श्री कुरकुट गुरुजी, श्री दत्तात्रय कुलकर्णी, सरपंच श्री सुकेश भंडारे, उप सरपंच श्रीमती अख्तर बी,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच सुकेश भंडारे, ग्राम सेवक, संयोजन समितीचे रवी उरगुंडे, सतीश कुलकर्णी, सिध्देश्वर व्यवहारे, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.या वेळी गावातील हजारो नागरिक, सर्व शाळाचे शिक्षक व विद्यार्थी, अनेक पञकार उपस्थित होते..

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post