कारंजा - मुजाहिद
भिमा कोरेगाव (पुणे) येथील शौर्य दिनाला २०० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्य शहीद स्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो बहुजन बांधव तेथे एकञ झालेले होते. त्यामध्ये सर्वच पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते सुध्दा उपस्थित होते.परंतु विकृत प्रवृत्तीच्या काही लोकांनी अनेक दिवसांपासून जाणीवपूर्वक षडयंत्र रचून १ जानेवारीच्या कार्यक्रमावर जो हल्ला केला या प्रकरणात पोलिस प्रशासनाने सम्बंधित गुन्हेगारांवर गुन्हा दाखल केला असून अजुन पर्यन्त या समाज कंटकांना अटक करण्यात आलेली नाही भीमा कोरेगाव प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांना त्वरित अटक करून कड़क कार्रवाई करावी या मागणीसाठी 20 जानेवारीला वाशीम जिलाधिकारी कार्यालयावर भारिप बमस च्या वतीने सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजे पर्यन्त धरना आंदोलन आयोजित करण्यात आले आहे या धरना आंदोलनात जिल्यातील सर्व भारिप बमस पदाधिकारी,कार्यकर्ते व तमाम भीमसैनिक महिला व पुरुषांनी हज़ारो च्या संख्येने उपस्थित राहवे ही विनंती
