![]() |
नीलेश सूखसोहळे
अकोला, दि. 28 - बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन आज दि.29 जानेवारी 2018 रोजी राधादेवी गोयनका महिला महाविदयालय येथे करण्यात आले होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी भारतीय सेवा सदनचे अध्यक्ष दिलीपराज गोयनका, राधादेवी गोयनका महिला महाविदयालयाचे प्राचार्य देवेंद्र व्यास, खंडेलवाल ज्वेलर्सचे नितीन खंडलेवाल, पॅडसन्स इंडस्ट्रीजच्या अपुर्वा पडगीलवार, आर के टेक्नॉलाजीचे रेखा अरंविद देठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजगता विभागाचे सहाय्यक संचालक दत्ता ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती होती. देशातील एकूण लोकसंख्येच्या 60 टक्के लोकसंख्या ही चाळीशीच्या आत आहे. तसेच देशाची 50 टक्के लोकसंख्या महिलांची आहे. स्त्री शक्तीला योग्य व्यासपिठ मिळाले तर देशाच्या विकासासाठी हि स्त्रीशक्ती कामी येवू शकते हा विचार करून देशाच्या बांधणीसाठी काम करीत असतांना स्त्रीयांनी शिक्षणासोबत कौशल्य निर्माण करावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले.
![]() |

