तेल्हारा आजाराची बस गायगाव येथे पडली बंद


प्रवीण वैष्णव

  •      ही बाब नित्याचीच 
तेल्हारा :- अकोला येथून तेल्हारा आजाराची बस निघाली असता दहा किमीच्या अंतरावरच गायगाव येथे बंद पडली. तेल्हारा ग्रामीण भागातील नागरिक दवाखान्याच्या, व्यवसायाच्या तसेच इतर कामानिमित्त दररोज जिल्ह्याची मुख्य बाजार पेठ असल्याने अकोला गाठावे लागते. अकोला जायचे म्हटले की अगोदरच सकाळी लवकर निघावे लागते म्हणजेच आपली कामे पूर्ण करता येतात. सकाळ पासून घरून निघाल्या नंतर दिवसभार्याच्या दागदागिने त्रासलेले नागरिक घराकडे निघण्याची आतुरतेने वाट बघतो कसेबसे त्याला बस स्टॉप वर आल्यावर वास मिळते. तेल्हाऱ्याची बस आली म्हणून तो निवांतपणे स्वास घेऊ। बस मध्ये बसतो तर तब्बल दहा किमी गेल्यानंतर तीच बस बँड पडते. बँड पडल्यानंतर खूप वेळ तेथे थांबल्या नंतर तेल्हारा डेपोच्या दुसरी बस त्याच मार्गाने येतांना दिसते ते बस थांबविल्यानंतर सदर बसचे चालक प्रवाशी घेण्यास नकार देतात. दिवसभर थकलेला, त्रासलेला माणूस कसाबसा आपल्या घराकडे निघतो आणि त्याच्या सोबत ह्या घटना घडतात. तर ही घटना तेल्हारा डेपोकरिता नवीन नसून नित्याचीच बाब झालेली  आहे, त्याकरिता एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देवीं तेल्हारा तालुक्यातील प्रवाश्यांना तेल्हारा बस आगरकडून होत असलेला त्रास हा कुठंतरी थांबावा याकरिता वरिष्ठांनी लक्ष घालावे असे प्रवाश्यांमधून मागणी होत आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post