संगणक साक्षरता काळाची गरज – डॉ. अमित कावरे


अतुल नवघरे
लाखपुरी :२८, मुर्तिजापुर तालुक्यातील लाखपुरी सर्कल मधील २७-१-२०१८ रोजी जि.प. प्राथ.शाळा रसुलपुर येथे मा. आमदार श्री. हरिषभाऊ पिंपळे यांच्या शुभहस्ते डिजीटल शाळेचा लोकार्पणसोहळा पार पडला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष गावातील जेष्ठ नागरीक श्री. शंकरराव साबळे हे होते. सर्वप्रथम सरस्वती व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच छत्रपती शिवाजी महराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे पुजन व हारार्पण करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांचा सत्कार ग्रामस्थानच्या वतीने करण्यात आला. रसुलपुर येथील जिल्हा परिषदेची ‘एक लाख चार हजार ’एवढी प्रचंड लोकवर्गणी  गावातुन करुन  शाळा डिजीटल करण्यात आली. केवळ चारशे लोकसंख्या असलेल्या गावातुन एवढया मोठ्या प्रमाणात लोकवर्गणी करुन हा एक विक्रमच स्थापन झालेला आहे. शाळेच्या सर्व भौतीक गर्जा पुर्ण करण्यात आलेला असुन ही शाळा  प्रगतसुध्दा  आहे. त्यामुळे सर्वच  स्तरातून कौतुक करण्यात येत आहे. यावेळी  डॉ.अमितभाऊ कावरे , नारायण भटकर , रावसाहेब कांबे , ग.ट.शि. अ. श्री. शाम राऊत , श्री. अली सर , सराळे सर , केंद्रप्रमुख कु. नुतन बोंबडे , साबळे , इंगळे , गेडाम , जामनिक , सरडे. मेश्राम ,रामेश्वर हरणे , श्री सुनिल वैद्य व समस्त ग्रामस्थ व लाखपुरी केद्रातील सर्व शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांची उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सुत्र संचालन मुख्याध्यापक श्री . विजय हरणे यांनी केलेव आभार प्रदर्शन कु. मंगला सोळंके (स.अ) यानी केले. अशाप्रकारे हा कार्य़क्रम अतिशय उत्साहात पार पडला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post