बुलडाणा : सेंद्रीय शेती ही विषमुक्त शेती असून या शेतीमधून मिळालेले अन्नधान्य पोषक असते. सेंद्रीय शेतीला यापूर्वीच प्राधान्याने स्वीकारायला पाहिजे होते. मात्र त्याप्रमाणात स्वीकारले गेले नाही. विषमुक्त भाजीपाला, अन्नधान्य आणि सशक्त समाज निर्मितीसाठी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे वळावे, असे आवाहन राज्याचे कृषी तथा जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी आज केले.सिंदखेड राजा येथे भारतीय गोवंश रक्षण संवर्धन परिषदद्वारा शेतकरी जागर यात्रा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार धृपदराव सावळे, विनोद वाघ, सेंद्रीय शेती करणारे शेतकरी राजेश्वर निवल, नारायण शिंदे, हेमंत शिंदे, सनद गुप्ता,दिवाकर नेरकर, समाधान शिंगणे आदी उपस्थित होते.सेंद्रीय शेतीबरोबरच घरोघरी गायी पाळण्याचे आवाहन करीत मंत्री श्री. फुंडकर म्हणाले, गायीच्या मुत्रापासून, दुधापासून आरोग्यास हितकारक पदार्थ बनविल्या जातात. त्यामुळे एक घर एक गाय हा संकल्प केला पाहिजे. सेंद्रीय शेतीच्या प्रचारासाठी शासनस्तरावरून मदत देण्यात येईल. यावेळी सेंद्रीय शेतमाल उत्पादक शेतकरी, भारतीय गोवंश परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे - पांडुरंग फुंडकर