हवामानाचा पूर्वलक्षी अंदाज शेतकऱ्यांना शेतीकरिता लाभदायी - अनिल गडेकर


नागपूर, दि.19 : भारतीय शेती ही हवामानावर आधारित आहे. निसर्गाच्या अनियमिततेमुळे शेतकऱ्यांना फटका बसतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सूचनासतर्कतेमुळे शेतकरी आपल्या पिकास बदलत्या हवामानापासून वाचविण्याचा प्रयत्न करु शकतोअसे प्रतिपादन जिल्हा माहिती अधिकारी अनिल गडेकर यांनी केले प्रादेशिक हवामान केंद्रनागपूर यांच्या वतीने आज हवामानाच्या अंदाजाचा प्रसार आणि प्रसार’ याविषयी माध्यमांच्या प्रतिनिधींसाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते उद्घाटक म्हणून बोलत होते.याप्रसंगी प्रादेशिक हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जे. आर. प्रसादरायपूर येथील हवामान केंद्राचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश खरेभोपाल येथील हवामान केंद्राचे आय. जे. वर्माशास्त्रज्ञ अविनाश ताठे, शास्त्रज्ञ श्रीमती भावना प्रामुख्याने उपस्थित होते.हवामान विषयक माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील हवामान केंद्र सुरु करण्यात आले असून या केंद्राच्या माध्यामातून प्राथमिकस्तरावर शेतकऱ्यांना एसएमएस प्रणालीद्वारे हवामानाच्या अंदाजाची माहिती दिली जाते. याशिवाय प्रसारमाध्यमांद्वारे देखील हवामानात होणाऱ्या बदलाची माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. प्रादेशिक हवामान केंद्राच्या वतीने आयोजित कार्यशाळेचा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना लाभ होईलअसा विश्वास अनिल गडेकर यांनी व्यक्त केला.प्रादेशिक हवामान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. जे. आर. प्रसाद यांनी कार्यशाळा आयोजनासंबंधी माहिती दिली. प्रसार माध्यमांचा हवामान अंदाजाची माहिती सर्वसामान्यांपर्यत पोहोचविण्यात महत्वाचा वाटा असल्याचे त्यांनी सांगीतले.प्रादेशिक हवामान केंद्राचे संचालक अविनाश ताठे यांनी हवामानाविषयी माहिती मिळविण्याची उत्सुकता ही अधिक दिसून येते. हवामान हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. पर्यावरणात होत असलेल्या बदलामुळे जगभरातील तापमानात वाढ होत आहे. नासाच्या मते, 2017 हे सर्वाधिक तापलेले वर्ष म्हणून नोंद करण्यात आली आहे. याशिवाय येणाऱ्या वर्षात थंडी कमी पडल्याने यंदाच्या उन्हाळा कडक राहण्याची शक्यता यावेळी वर्तविण्यात आली.  
सत्रात विविध विषयांवर प्रकाश
उद्घाटन सत्रानंतर उपस्थित तज्ज्ञांनी विविध विषयांवर प्रकाश टाकला. यावेळी रायपूर येथील शास्त्रज्ञ डॉ. प्रकाश खरे यांनी हवामानाच्या अंदाजाचा प्रचार व प्रसार’, शास्त्रज्ञ ब्रिजेश कनोजिया यांनी रडारच्या माध्यमातून हवामानाचा घेण्यात येणारा अंदाज आणि हवामान विभागाची भूमिका’ विशद केली. शास्त्रज्ञ श्रीमती भावना यांनी हवामानाचा अंदाज निश्चित करताना वापरण्यात येणारी यंत्रणा’ कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात उपस्थितांनी प्रश्नोत्तराद्वारे संवाद साधून तज्ज्ञांनी त्याचे निराकरण केले. यावेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधीप्रादेशिक हवामान केंद्राचे अधिकारीकर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन एस. एस. अमर्ते व श्रीमती रिना सूरयाम यांनी केले

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post