मराठा आरक्षण: ७ ऑगस्टपर्यंत निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र



बीड : - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने ७ ऑगस्टपर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा सकल मराठा समाजाच्यावतीने देण्यात आला आहे. ठिय्या देऊन तसेच शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात यावे. कुणीही हिंसेचा मार्ग अवलंबू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

परळी येथे आज मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरवण्यासाठी सकल मराठा समाजाची बैठक झाली. या बैठकीत आरक्षणासाठी सुरू असलेलं आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, मराठा समाजाला तत्काळ आरक्षण देण्यात यावे, अशा मागण्यांचा यावेळी पुनरुच्चार करण्यात आला.


SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post