Showing posts with label अमरावती. Show all posts
Showing posts with label अमरावती. Show all posts
जनजागृतीच्या माध्यमातून महिला व बालकांवरील अत्याचारांवर नियंत्रण शक्य :  जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे

जनजागृतीच्या माध्यमातून महिला व बालकांवरील अत्याचारांवर नियंत्रण शक्य : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे

 


अठरा वर्षाखालील मुले आणि मुलींनी दुचाकी वाहने   चालवणे कायद्याने गुन्हा.

मुर्तीजापुर : महिला व बालक यांच्यावर होणारे अत्याचार जनजागृतीच्या माध्यमातून नियंत्रणात आणणे शक्य आहे. महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना करीता सर्वांनी सजग राहावे.अशी घटना कुठे दिसून येत असल्यास त्याबाबत पोलिसांना कर्तव्य समजून माहिती दिल्यास अत्याचारा ग्रस्तांना मदतीचा हात  देता येईल.वाईट हेतूने केलेल्या 

स्पर्शबाबत(बॅड टच) प्रतिकार करण्याची क्षमता ठेवावी. अठरा वर्षाखालील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी दुचाकी वाहने चालवणे तसेच ट्रिपल सीट बसविणे कायद्याने गुन्हा आहे.तेव्हा पालकांनी देखील लहान वयापासूनच आपल्या पाल्यांना कायदा मोडण्याची मुभा देऊ नये.पालकांनी याची दखल घ्यावी.असे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचे प्रावधान देखील कायद्यात आहे.असे प्रतिपादन अकोला जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केले.त्यांच्या संकल्पनेतून आयोजित महिला व बालक सुरक्षा व सुरक्षात्मक उपाययोजना याबाबत आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.या कार्यशाळेचे आयोजन मुर्तीजापुर शहर पोलीस स्टेशनच्या वतीने महालक्ष्मी मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते. 

याप्रसंगी व्यासपीठावर दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.कुरेशी साहेब,उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार,नगरपालिकेच्या मुख्याधिकारी सुप्रिया टवलारे तसेच अकोला दामिनी पथकाच्या पोलीस निरीक्षक उज्वला देवकर, शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे थानेदार सुरेंद्र राऊत,माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुरवसे यांची उपस्थिती होती.



यावेळी दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश श्री.कुरेशी साहेब यांनी देखील उपस्थित विद्यार्थ्यांना कायदेविषयक मार्गदर्शन करुन महत्त्वपूर्ण माहिती दिली.याप्रसंगी विविध शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शहरातील मान्यवर, महिलावर्ग यांची देखील उपस्थिती होती.याप्रकारे तालुका आणि ग्रामीण भागात विविध स्तरावर कार्यशाळा आयोजित करून जनजागृती करण्यात येणार असल्याचे संदीप घुगे यांनी पुढे बोलताना सांगितले.यावेळी शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घुगे यांनी देखील गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याकरिता विविध उपाय योजनांबाबतची माहिती दिली.सूत्रसंचालन गोपाल मुकुंदे यांनी केले.तर आभार पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी यांनी केले.

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा


अमरावती : सामान्य नागरिकांनी राज्य माहिती आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वतः च्या ई-मेलद्वारे आयोगाचा ई-मेल आयडी dsmsicamwt@gmail.com वर सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह २० रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी लावण्याची व्यवस्था केली आहे. परंतू आयोगाकडे असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी न चुकता नमूद करावा, असे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ अमरावती  संभाजी सरकुंडे यांनी कळविले आहे.यासंदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, कोविड-१९ या विषाणूचा प्रादुर्भाव होऊन जनजीवन ठप्प झाले आहे. अनेकविध  आवश्यक वस्तूचे उत्पादन करणारे  कारखाने, अनेकविध सरकारी कार्यालये, बँक, दळवळण ठप्प झाले आहे. राज्य माहिती आयोग खंडपीठ अमरावती हे कार्यालय  देखील कोणत्याही काम करण्याविना बंद करण्यात आले आहे. अन्यथा दर महिन्याला  या कार्यालयात केंद्रीय माहितीचा अधिकार आधीनियमांचे कलम १९(३) च्या तरतुदींनुसार ३५० चे आसपास व्दितीय अपील अर्ज व कलम १८ नुसार महितीसंबंधी तक्रारी दाखल होतात. ही आवक पोस्टाचे व्यवहार बंद असल्यामुळे थांबून गेली आहे. माहे मार्चपासून लॉक डाउन १,२,३ व आज दि.१८ मे पासून ४ था सुरू झाला आहे. तरी देखील यापुढे कार्यालय बंद असले वा ३३% मर्यादित उपस्थितीसह सुरू करण्यात आले असले तरी दळणवळणाची साधने उपलब्ध नसल्यामुळे व तसेच ती वापरास निर्बंध असल्यामुळे नागरिकांना व्यक्तीशः माहिती आयोगाचे कार्यालयात येण्यासाठी दुरापास्त झाले आहे.
     या पार्श्वभूमीवर जरीही नागरिकांना आयोगाचे कार्यालयात व्यक्तिशः येणे शक्य होत नसले तरीही अप्रत्यक्षपणे अंतरावरून आयोगाचे कामकाज सुरू करण्यात आले असून मागील  तीन वर्षांपासून आजमितीस आयोगाकडे प्राप्त होऊन नोंदविलेल्या ८००० व्दितीय अपील अर्जावर व १००० तक्रार अर्जावर सूनावण्या घेण्याचे कामकाज सुरू केले आहे. अंतरावरून अप्रत्यक्ष सुनावण्यांचे भाग म्हणून अपिलार्थी व तक्रादार यांचे अर्जावर संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाला त्यांचे कार्यालयीन ई-मेल आयडी वर विस्तृत नोटीस पाठविण्यात येत असून सविस्तर खुलासे मागविण्यात येत आहेत. अपिलार्थी व तक्रारदार यांना सुनावणीच्या दृष्टीने संपर्क करण्यासाठी अर्जावर त्यांचे किमान मोबाइल क्रमांक देखील उपलब्ध नाहीत. ई-मेल आयडी तर नाहीतच नाहीत. यामुळे त्यांना संपर्क करण्यात मोठी अडचण होत आहे. तसेच सार्वजनिक प्राधिकरणावर बजावण्यात येत असलेल्या नोटिसमधून अपिलार्थी व तक्रारदार यांचे मोबाइल क्र.व असल्यास ई-मेल आयडी प्राप्त करून आयोगास पुरविण्याची देखील त्यांना विनंती करण्यात येत आहे. त्याशिवाय अपिलार्थी व तक्रारदार याना इ-मेलवर नोटीस देणे, गरजेनुरूप अप्रत्यक्ष सुनावणीचा भाग म्हणून त्यांना व्हाट्स अँप कॉल करून ऐकून घेणे, श्राव्य सुनावणीचा भाग म्हणून साधा कॉल करून ऐकून घेण्यासाठी मोठीच अडचण भासत आहे. म्हणून सर्व सार्वजनिक प्राधिकरणे व जनतेच्या सोयीसाठी कळविण्यात येत आहेकी सामान्य नागरिकांनी आयोगाकडे प्रत्यक्ष न येता स्वतः च्या ई-मेलद्वारे आयोगाचा ई-मेल आयडी.dsmsicamwt@gmail.com वर सर्व कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह २० रुपयांचा स्टॅम्प लावून अर्ज केल्यास तात्काळ सुनावणी लावण्याची व्यवस्था केली आहे. परन्तु आयोगाकडे असा पत्रव्यवहार करण्यासाठी आपला भ्रमणध्वनी क्रमांक व ई-मेल आयडी न चुकता नमूद करावा असे राज्य माहिती आयुक्त खंडपीठ अमरावती संभाजी सरकुंडे यांनी कळविले आहे.
खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बाह्यरूग्ण तपासणी सुरू ठेवावी- विभागीय आयुक्त पियूष सिंह यांचे आवाहन

खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बाह्यरूग्ण तपासणी सुरू ठेवावी- विभागीय आयुक्त पियूष सिंह यांचे आवाहन



  • रूग्णालये बंद ठेवल्यास डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करणार

अमरावती : कोरो विषाणू संसर्गाच्या भितीने विभागातील काही डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिक बाह्यरूग्ण तपासणी आणि रूग्णालये बंद ठेऊन वैद्यकीय सेवा देत नसल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी बाह्यरूग्ण तपासणी सुरू ठेवावी असे आवाहन विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी केले आहे.
कोरोना विषाणू हा तीव्र संसर्गजन्य स्वरूपाचा असल्याने याबाबत तातडीने खबरदारीच्या प्रतिबंधात्मक उपायायेजना करणे आवश्यक आहे. मात्र काही डॉक्टर्स आणि वैद्यकीय व्यावसायिक संसर्गाच्या भितीने रूग्णालये बंद ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. कोरोना विषाणूच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय व्यावसायिकांनी आपल्या सेवा सुरळीत सुरू ठेवाव्यात. तसेच आवश्यकता भासल्यास त्या‍ठिकाणी त्यांची सेवा अधिग्रहित करण्याच्या सुचना त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जिल्ह्यातील खासगी वैद्यकीय सेवा बाह्यरूग्ण तपासणी आणि रूग्णालये सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घेण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी केल्या आहेत. वैद्यकीय सेवा बंद ठेवल्यास या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्या डॉक्टर्स, वैद्यकीय व्यावसायिक यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र कोवीड उपाययोजना नियम 2020, तसेच साथरोग अधिनियम 1897 नुसार कारवाई करावी, तसेच रूग्णालयांची नोंदणी रद्द करण्यासाठी इंडियन मेडीकल कौन्सिल तसेच आवश्यक त्या सक्षम प्राधिकरणासही कळविण्यात यावे, असे निर्देश विभागीय आयुक्त यांनी विभागातील जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.
अमरावतीच्या सायलीच्या ‘शहरी शेती’चा डंका

अमरावतीच्या सायलीच्या ‘शहरी शेती’चा डंका


 नागपूर :- अमरावतीच्या सायली राजू विरूळकर हिने मांडलेल्या 'अर्बन फार्मिंग'च्या संकल्पनेला लंडन युनिव्हर्सिटीने जगातील टॉप १२ मध्ये स्थान दिले आहे.
जि. प. पूर्व. माध्यमिक शाळा, सुकळी पं. स. अमरावती येथील सहाय्यक शिक्षक राजू विरुळकर आणि आदर्श प्राथमिक शाळा खापर्डे बगीचा अमरावती येथील मुख्याध्यापिका स्नेहल विरूळकर यांची कन्या असलेल्या सायलीने रिक्स युनिवर्सिटी (लंडन ) तर्फे आयोजित स्पर्धेत भाग घेतला होता. 'शहरांचे भविष्य व आव्हाने,'असा स्पर्धेचा विषय होता.

जगभरातील ३ लाख ६५ हजार स्पर्धक यात सहभागी झाले होते. 'शहरीकरणाच्या युगात भविष्यात शहरांना भासणारी संसाधनाची टंचाई' या विषयावर 'शहरातील शेती' हा महत्त्वपूर्ण प्रस्ताव सायलीने सादर केला होता. सर्वोत्कृष्ट १२ मध्ये स्थान मिळवणारी सायली ही दक्षिण आशिया झोनमधली एकमेव विद्यार्थिनी आहे. सायली आर्किटेक्ट (अर्बन डिझायनर)आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्किटेक्चर (मुंबई) येथून तिने आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले असून, भारतातील प्रसिद्ध शिक्षण संस्था एस.पी.ए. (दिल्ली) येथून अर्बन डिझाइन या विषयात मास्टर्स केले आहे .
शेतकरी हा देशाचा आत्मा आहे, तरीही या विकासाच्या आणि तंत्रज्ञानाच्या युगात त्याला उपेक्षित जीवन जगावे लागत आहे. त्याच बरोबर दररोज रोजगाराच्या शोधात फिरणाऱ्या हजारो तरुणांना घेऊन 'अर्बन फार्मिंग' या संकल्पनेद्वारे शाश्वत भविष्याची नवीन दारे उघडू शकतात, असे सायली म्हणते.

तिच्या या यशाबद्दल बालशिक्षण मंडळाच्या अध्यक्षा स्नेहलता महाजन, सचिव संध्या मराठे, डॉ. गोपाल राठी, मोहन बेलगामकर, मोहन बोबडे, प्रा. आनंद देशमुख, नितीन उंडे, अनुराधा लिंगे आदींनी तिचे अभिनंदन केले आहे.
पॉवर ऑफ मिडियाची अमरावती जिल्हा कार्यकारणी घोषित.

पॉवर ऑफ मिडियाची अमरावती जिल्हा कार्यकारणी घोषित.



  • अध्यक्षपदी उमेश लोटे तर रुपेश वाळके सचिव.

अमरावती :-  राज्यात नव्याने स्थापन झालेल्या द पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशन महाराष्ट्र या पत्रकार संघटनेची अमरावती जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली असून अमरावती जिल्हा अध्यक्षपदी व्हीसिएन वूत्तवाहिनीचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांची निवड करण्यात आली. अमरावतीचे जेष्ठ पत्रकार लोकशाही वार्ताचे विशेष प्रतिनिधी देविदास सूर्यवंशी (मामा) यांची उपाध्यक्षपदी तर सरचिटणीस पदी प्रेरणापुंजचे चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी सुभाष कोटेचा तसेच सचिव पदी मोर्शी तालुक्यातील देशोन्नतीचे दापोरी प्रतिनिधी रुपेश वाळके यांच्यासह १२ जिल्हा सदस्य, तालुका ग्रामीण व शहर असे एकूण ३१  अध्यक्ष, ग्रामीण जिल्हा महिला अध्यक्ष तसेच संघटनेच्या वाढीच्या दृष्टीकोणातून प्रसार माध्यमात काम करणाऱ्या पदाधिकारी व सदस्यांची संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप बाजड यांच्या सूचनेवरून द पॉवर ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली खालील मान्यवरांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

      अमरावती शासकीय विश्राम भवन सभागृहात झालेल्या या विशेष बैठकीच्या अध्यक्षस्थानी द पॉवर ऑफ मिडियाचे संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  दर्यापूरचे जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख, कोल्हापूरच्या जेष्ठ समाजसेविका सौ.रेखाताई आबिटकर, संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप बाजड, विदर्भ कोर कमेटीचे सदस्य ऋषिकेश वाघमारे, अमरावती विभाग अध्यक्ष प्रा.अजय देशपांडे, आजतक बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जका खान, अदैत कन्सल्टिंगचे अद्वैत चव्हाण, व्हीसिएन वूत्तवाहिनीचे संपादक अमोल नानोटकर, उमेश जयस्वाल, आशुतोष जिचकार यांच्यासह अन्य मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.अजय देशपांडे यांनी तर सूत्र संचालन अनिता बाजड (काळे) यांनी केले.

      आज घोषित करण्यात आलेली जिल्हा कार्यकारणी पुढीलप्रमाणे, अमरावती जिल्हा अध्यक्षपदी व्हीसिएन वूत्तवाहिनीचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांची निवड करण्यात आली. अमरावतीचे जेष्ठ पत्रकार लोकशाही वार्ताचे विशेष प्रतिनिधी देविदास सूर्यवंशी (मामा) यांची उपाध्यक्षपदी तर सरचिटणीस पदी प्रेरणापुंजचे चांदूर रेल्वे तालुका प्रतिनिधी सुभाष कोटेचा तसेच सचिव पदी मोर्शी तालुक्यातील देशोन्नतीचे दापोरी प्रतिनिधी रुपेश वाळके, जिल्हा संपर्क प्रमुख पदी साहित्यिक मंगेश मोरे, तथा जिल्हा सदस्य पदी देशोन्नतीचे दर्यापूर तालुका प्रतिनिधी जेष्ठ पत्रकार गजानन देशमुख, लोकशाही वार्ताचे अचलपूर/परतवाडा प्रतिनिधी आशिष गवई, सकाळचे प्रतिनिधी प्रकाश गुळसुंदरे, मातुभूमीचे वरुड तालुका प्रतिनिधी चंद्रकांत भड, देशोन्नतीचे वितरण व्यवस्थापक मंगेश वानखडे, पुण्यनगरी अमरावती प्रतिनिधी संदीप शेंडे, वृत्तकेसरीचे अमरावती प्रतिनिधी सुरेंद्र बिसने, दिव्यमराठीचे तिवसा प्रतिनिधी स्वप्नील उमप, दिव्यमराठीचे चांदूरबाजार प्रतिनिधी बादल डकरे यांची तर जिल्हा मुख्य सल्लागार सदस्यपदी नवप्रहारचे संपादक संजय पांडे, तर कृषिप्रधान वाहिनीचे संपादक धीरज मानमोडे, सुदर्शन वूत्तवाहिनीच्या जिल्हा प्रतिनिधी पुष्पा जैन व वाशिम जिल्हा सदस्यपदी राहुल भुतेकर, महादेव हरणे, दिव्यमराठी रिसोडचे प्रतिनिधी संदीप पवार यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

   त्याचबरोबर अमरावती महिला जिल्हा अध्यक्षपदी अहिल्या किरणच्या प्रतिनिधी व साहित्यिक संगिताताई भेंडे (ढोके), महिला शहराध्यक्ष पदी हिंदुस्थानच्या प्रतिनिधी कु. दिपा पाल तर अमरावती शहराध्यक्ष पदी जनमाध्यमचे विशेष प्रतिनिधी स्वप्नील सावळे, व बडनेरा शहर अध्यक्षपदी जीवन राऊत  यांची तर भातकुली तालुका अध्यक्षपदी देशोन्नतीचे संतोष शिंदे तर शहर अध्यक्षपदी लोकमतचे किशोर लेंडे, दर्यापूर तालुका अध्यक्षपदी विदर्भ मिडियाचे अमोल कंठाळे व शहर अध्यक्षपदी लोकमतचे किरण होले, अंजनगाव (सुर्जी.) तालुका अध्यक्षपदी लोकमतचे मनोहर मुरकुटे, शहर अध्यक्षपदी पुण्यनगरीचे प्रवीण बोके, अचलपूर - परतवाडा तालुका अध्यक्षपदी भास्करचे पंकज साबू व अचलपूर शहर अध्यक्षपदी अमरावती मंडळचे फिरोज खान, चांदूरबाजार तालुका अध्यक्षपदी देशोन्नतीचे अनिल उर्फ शशिकांत नीचत तर शहर अध्यक्षपदी सकाळचे वैभव उमक, चिखलदरा तालुका अध्यक्षपदी देशोन्नतीचे विनायक येवले तर शहर अध्यक्षपदी सकाळचे नारायण येवले, त्याचबरोबर धारणी तालुका अध्यक्षपदी पुण्यनगरीचे पंकज लायदे व शहर अध्यक्षपदी सकाळचे प्रतिक मालवीय तसेच मोर्शी तालुका अध्यक्षपदी अजय पाटील व शहर अध्यक्षपदी तरुणभारतचे संजय घारपवार, वरुड तालुका अध्यक्षपदी प्रतिदिन अखबारचे दीपक खंडेलवाल तथा शहर अध्यक्षपदी तरुणभारतचे विलास पाटील, तिवसा तालुका अध्यक्षपदी सकाळचे कृष्णा उमप व शहर अध्यक्षपदी देशोन्नतीचे संदेश मेश्राम, चांदूररेल्वे तालुका अध्यक्षपदी सिसिएन वृत्तवाहिनीचे संपादक अमोल गवळी तर शहर अध्यक्षपदी राजेश सराफी, धामणगाव रेल्वे तालुका अध्यक्षपदी विदर्भ २४ तास वृत्तवाहिनीचे छगन जाधव व शहर अध्यक्षपदी जिएम न्यूज वृत्तवाहिनीचे वैभव बावनकुळे, नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्षपदी लोकमतचे अमोल धवसे तर शहर अध्यक्षपदी लोकमतचे विनेश बेलसरे व अमरावती शहर सदस्यपदी आशिष इंगळे, पदमाकर मांडवधरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
उद्या संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांचा अमरावती दौरा.

उद्या संस्थापक अध्यक्ष किशोर आबिटकर यांचा अमरावती दौरा.



  • २९ ऑगस्टला अमरावती विभाग निहाय बैठकीचे आयोजन.
  • द पॉवर ऑफ मीडियाच्या पदाधिकारी, सदस्य तथा प्रसार माध्यमातील बंधू-भगिनींना उपस्थित राहण्याचे आवाहन.

अमरावती :-  द. पॉवर ऑफ मिडिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री.किशोर आबिटकर साहेब या पत्रकार संघटनेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच उद्या मंगळवार दिनांक २८ ऑगस्ट रोजी अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यानिमित्ताने अमरावती विभागातील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य तसेच अमरावती शहरासह ग्रामीण भागातील प्रसार माध्यमातील संपादक, पत्रकार, वार्ताहर, बातमीदार, इलेक्ट्रानिक्स माध्यमातील पत्रकार, साहित्यिक, लेखक, कवी, प्रेस फोटोग्राफर, कार्टुनिष्ठ, वृत्तपत्र वितरक क्षेत्रात काम पाहणाऱ्या महिला – पुरुष बांधवांसाठी एका महत्वाच्या बैठकीचे आयोजन बुधवार २९ ऑगस्ट २०१८ रोजी दुपारी ३ वाजता बियाणी चौक अमरावती येथील सा.बां.विभागाच्या शासकीय विश्रामगृह रूम नंबर १३ येथे करण्यात आले आहे. तरी प्रसार माध्यमातील सदस्यांनी बैठकीला आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन संघटनेचे संस्थापक सदस्य संदीप बाजड, अमरावती विभाग प्रमुख श्री.ऋषिकेश वाघमारे यांनी केले.