खिरोदा पाल रस्त्यावरील बोर घाट.. एक मृत्यूचा सापळा!


भुषण महाजन
रावेर प्रतिनिधी :- रावेर तालुक्याच्या खिरोदा - पाल रस्त्यावरील बोरघाट हा मृत्यू चा घाट बनला आहे या घाटात अतिशय तीव्र उतार, अवघड वळणे आणि संरक्षक कठडय़ाचा अभाव यामुळे बोर घाट मृत्यूचा सापळा बनला आहे.
सावदा मार्गे खिरोदा पाल येणाऱ्यांसाठी जाणाऱ्या साठी जवळचा रस्ता म्हणून बोर घाटातून जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढली आहे. मात्र, या घाटात अतिशय तीव्र उतार, अवघड वळणे आणि संरक्षक कठडय़ाचा अभाव यामुळे बोर घाट मृत्यूचा सापळा बनला आहे.

या घाटात गेल्या वर्षभरात चार ते पाच अपघात झाल्यानंतरही त्यात बदल झालेला नाही.खिरोदा ते पाल रस्ता या दरम्यान हा जवळचा मार्ग आहे. पाल पर्यटण स्थळ असल्याने   बरेच जण या रस्त्याचा वापर करतात. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्यावर वाहनांची संख्या वाढली आहे. एक महिन्यापूर्वीच एका पत्रकाराचा या घाटात अपघात झाला होता तसेच काही महिन्या पूर्वी  झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला होता. तसेच  एका पीकअप व्हॅनचाही अपघात झाला होता. याबाबत वेळोवेळी स्थानिक नेते आणि प्रशासनाकडे या ठिकाणी कठडे बांधण्याची मागणी करण्यात आली. मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष करण्यात येत आहे.

 रावेर मतदार संघातील हे गावे असुन मतदार संघातील नेत्यांचे या गावाकडे नेहमीच दुर्लक्ष राहिलेले आहे. या घाटात धोकादायक वळण, अपघातप्रवण क्षेत्र अशा सूचनांचे फलक लावलेले नाहीत, अशी माहिती येथील स्थानिक लोकांनी दिली. अलीकडे या रस्त्यावर वाहनांची रहदारी वाढली आहे. बोर घाटात एकापाठोपाठ तीव्र वळणे आहेत. त्यामुळे नवीन चालकाला ती पटकन समजत नाहीत. थोडीशी जरी चूक झाली तरी अपघात होण्याची शक्यता आहे. संध्याकाळी नवीन व्यक्तीला वाहन चालविणे या ठिकाणी अवघड आहे. अवघड वळणे काढून, या रस्त्यावर कठडे बांधावेत म्हणून शासनाने या कडे विशेष लक्ष देऊन किमान धोक्याचे सुचना देणारे फलक तरी लावावे,अशी मागणी जोर धरत आहे

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post