इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- बळीराजा चेतना अभियानांतर्गत शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी,शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, कर्जबाजारी पणामुळे धीर खचलेल्या शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागामार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक शासकीय योजना उपलब्ध आहेत.त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा असे प्रतिपादन नगराध्यक्षा सौ.पौर्णिमा जगदिश लांडगे यांनी केले.
जिल्हा प्रशासन व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बळीराजा चेतना अभियान अंतर्गत लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी शहरातील तालुका ग्रामीण रुग्णालयात दि.13 जुलै रोजी सर्वरोग निदान शिबिराचे घेण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा पौर्णिमा लांडगे या होत्या.यावेळी प्रमुख म्हणुन जिल्हा परिषदच्या समाजकल्याण सभापती चंद्रकला नारायणकर,नायब तहसीलदार रणजित शिराळकर,
तालुका ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.आर.यु.सुर्यवंशी,पो.नि.सर्जेराव भंडारे,सास्तुर येथील स्पर्श ग्रामीण रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ.रमाकांत जोशी,लातूर मेडिकल कॉलेजचे डॉ. किशोर जाधव,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.महेश पाटील, डॉ.गुरुराज थट्टेकर,डॉ.सारंग गाढवे,डॉ.जे.के.
साठे,डॉ.सुनिल मंडले,अदि उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.रमाकांत जोशी यांनी केले.यावेळी बोलताना रमाकांत जोशी म्हणाले की,नीती आयोगामार्फत उस्मानाबाद जिल्ह्याचा मागास जिल्ह्यात नोंद झाली आहे.हे मागासलेपण दुर करण्यासाठी केंद्र व राज्य शासनामार्फत अनेक आरोग्य विषयक योजना उपलब्ध झाल्या आहेत. नीती आयोगामध्ये माताबाल संगोपनास अतिशय महत्व देण्यात आले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.तसेच महात्मा फुले जीवनदायी योजना व तीस वर्षाच्या वरील व्यक्तींसाठीच्या असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत योजनांचा लाभ गरीब, गरजू रुग्णानी घ्यावा असे आवाहन यावेळी जोशी यांनी केले.या शिबिरात लोहारा शहरासह तालुक्यातील 257 स्त्रीया व 208 पुरुष अशा एकुण 465 रुग्णांची तपासणी करुन औषध उपचार करण्यात आला आहे. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व अभार जगदीश कुलकर्णी यांनी मानले.या कार्यक्रमास नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
