इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- लोहारा शहरातील ग्रामिण रुग्णालय अत्यावश्यक सुविधाचा अभाव असल्याने रुग्णांना योग्य असा उपचार मिळत नाही,तरी लवकरात लवकर अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करुन द्यावी,अशी मागणी लोहारा शहरातील सामाजिक कार्यकर्ते जालींदर (भाऊ) कोकणे व माजी समन्वय समिती अध्यक्ष नागप्पा वकील यांनी निवेदनाद्वारे जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडे केली आहे.
या निवेदनात म्हटले आहे कि,शहरातील तालुका ग्रामिण रुग्णालयात क्ष — किरण मशीन,सोनाग्राफी मशीन,इ.सी.जी.मशीन,शुगर स्ट्रीप,ब्लड स्टोरेज सुविधा,हिंद लँब सुविधा,भुलतज्ञ डॉक्टर,पोलीस चौकी मान्यता,डबल इलेक्ट्रीसिटी कनेक्शन,सोलार सिस्टीम किंवा जरनेटर,अशा विविध सुविधा नसल्याने रुग्णांना बाहेर गावी जावुन उपचार घ्यावा लागत आहे.व त्याच बरोबर कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.ती तात्काळ भरण्यात यावी,अशी मागणी निवेदनात केली आहे.या निवेदनावर जिल्हा सहकार बोर्डाचे संचालक अविनाश माळी,नगरसेवक आरीफ खानापुरे,युवक कॉग्रेस शहराध्यक्ष हरी लोखंडे,इस्माइल मुल्ला,यांच्या सह्या आहेत.
