विद्यार्थी काँग्रेस (NSUI) व युवक काँग्रेसच्या मागणीला यश

जाहिरात

अमरावती :- वेळापत्रकात बदल झाल्यामुळे व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना याबाबत न कळवल्याने इलेक्ट्राॅनिक्स अॅन्ड टेलीकम्युनीकेशन शाखेच्या १७५ विद्यार्थ्यांना पेपर देता आला नव्हता. पेपरची तारिख निघुन गेल्यावर पेपर होऊन गेल्याचे विद्यार्थ्यांना कळले. यवतमाळ, शेगाव, चिखली इ गावांतील १० इंजीनीयरींग काॅलेजच्या १७५ विद्यार्थ्यांच्या वर्षाचे नुकसान होऊ नये म्हणुन पेपर परत घेण्याची मागणी NSUI व युवक काँग्रेसतर्फे ८ दिवसांपुर्वी करण्यात आली होती. विद्यापीठाने सकारात्मक निर्णय घेऊन विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करुन त्यांचे वर्ष वाया न जाऊ देता, पुन्हा पेपर घेण्याचा निर्णय घेतला आहे. ७-१० दिवसांत पेपरची तारीख कळवणार असल्याचं विद्यापीठाने जाहीर केले असून नव्या सिल्याबसनुसार त्यांचा पेपर परत घेण्यात येणार आहे. या निर्णयाचं NSUI व युवक काँग्रेसने स्वागत केले असून प्र- कुलगुरु जयपुरकर साहेब यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांनी विद्यापीठ तसेच युवक काँग्रेसचे  निलेश गुहे, बबलु बोबडे,  गुड्डु धर्माळे,प्रदेश विद्यार्थी काँग्रेस चे  निनाद मानकर,स्वप्नील साव, पियुश वसु, , जिल्हा विद्यार्थी काँग्रेस चे गौरव पवार, उपाध्यक्ष अथर्व वंजारी, महासचीव संकेत साहु, प्रदेश प्रवक्ता ओजस मोरे, माजी उपाध्यक्ष संकेत बोके, महासचीव भैरवी जगताप, अकोला जिल्हा महासचीव अमेय महल्ले, सचीव पारस चौधरी, सचीव शुभम पारोदे, आकाश गावंडे इ.चे आभार मानले आहेत.
जाहिरात

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post