विद्युल्लता​ गागालगा लगागा गागालगा लगा ​कधी कधी

​​
अंदाज  वागण्याचा चुकतो कधी कधी
आवेग भावनानांचा छळतो कधी कधी
सरकार देत जाते फसव्याच घोषणा
ऐकून रोज त्याना भुलतो कधी कधी
लटका मला जमाना  हिनवून बोलतो
उहासगर्भ हसणे  हसतो कधी कधी
ढोरा समान जेव्हा  शेतात राबतो
सोसून कष्ट तेव्हा  मरतो कधी कधी
आधार द्यावयाला नसतेच सावली
नामर्द होत मी ही झुरतो कधी कधी
खेचून ध्येय वेड्या विजयास आणतो
आनंद  दो घडीचा लुटतो कधी कधी
फसलोय खूप आता पाहून आरसे
जाणून वास्तवाला रडतो कधी कधी
माझे  भविष्य मी या मातीत पेरतो
दगडास देव म्हणतो रडतो कधी कधी

तुकाराम पाटील
पिंपरी चिंचवड पुणे १७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post