विधान परिषद निवडणुकीत भगवा फडकला, परभणी-हिंगोलीतून शिवसेनेचे विप्लव बाजोरिया विजयी.


परभणी :- हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विप्लव बाजोरिया यांनी जोरदार विजय मिळवला आहे. काँग्रेसच्या सुरेश देशमुख यांचा त्यांनी पराभव केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य मतदार संघाच्या निवडणुकीत पहिलं खातं शिवसेनेनं उघडलं.शिवसेनेच्या वतीने परभणी-हिंगोली स्थानिक स्वराज्य मतदार संघासाठी अधिकृत उमेदवार म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विप्लव बाजोरिया यांनाच एबी फॉर्म दिला होता. त्या विश्वासाला सार्थ करत विप्लव यांनी जोरदार विजय मिळवला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post