दि पॉवर ऑफ मीडियाची​ ​अमरावती विभागीय नियुक्ती जाहिर...

                     


  • ​अध्यक्ष - प्रा.अजय देशपांडे​
  • ​सचिव - गणेश सोनोने​
  • ​संघटक - मकसूद अली,​
  • ​संपर्क प्रमुख - अजय ढवळे,​
  • ​मुख्य सल्लागार - जका खान.​

  विशेष प्रतिनिधी,
​अमरावती : दि. पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनच्या अमरावती विभागीय अध्यक्ष पदी ऋतूगंधा मासिकाचे संपादक, साहित्यिक, लेखक, कवी, पत्रकार प्रा.अजयजी देशपांडे, विभागीय सचिव पदी टीव्ही-९ न्यूज वृत्तवाहिनीचे अकोला जिल्हा प्रतिनिधी गणेशजी सोनोने,तर विभागीय संघटक पदी एनटीव्ही व एमएच माझा न्यूज मराठी, न्यू इंडिया टाईम्स वेब पोर्टलचे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी मकसूदभाई अली, विभागीय संपर्क प्रमुख पदी दैनिक नवाकाळ व लार्ड बुद्धा वृत्तवाहिनीने वाशीम जिल्हा प्रतिनिधी अजयजी ढवळे यांची तर अमरावती विभागीय मुख्य सल्लागार पदी आजतक वृत्तवाहिनी बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी जका खान साहब यांची मिडिया ग्रुपच्या मुख्य कोअर कमेटीने बिनविरोध निवड केली आहे. 
जाहिरात

या निवडीमुळे अमरावती विभाग परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून ही पत्रकार संघटना प्रसार माध्यमातील कुठल्या भविष्यात पाऊल उचलणार यावरसर्वांचे लक्ष लागले आहे, यावेळी संपूर्ण विदर्भासह राज्यातून नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे अभिनंदन होत आहे.​

​प्रत्येक पत्रकारांच्या अंगी असलेली पॉवर हि लेखणीच्या माध्यमातून वाचायला मिळत असते, याच लेखणीतून सकारात्मक विचाराने अनेकांना न्याय देण्याचा सदैव प्रयत्न होत असतो, मात्र न्यायाची भूमिका घेत असलेल्या पत्रकारांच्या हिताचा कुणीही विचार करीत नसल्याचा प्रकार समोर आला आहे, 

प्रसार माध्यमातील स्त्री – पुरुष बांधवांना योग्य न्याय व शासकीय योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी कोल्हापुरातील अंबामाता यांचे आशीर्वाद घेऊन निघालेली पत्रकारांची संघटना “दी पॉवर ऑफ मिडिया” हि आता अमरावती येथील अंबा मातेचे दर्शन घेऊन विदर्भातील दाखल झाली आहे.​
जाहिरात


​दि. पॉवर ऑफ मीडिया फाउंडेशनचे संस्थापकअध्यक्ष व जेष्ठ पत्रकार मा.किशोरजी आबिटकर यांच्या आदेशान्वये व मीडिया ग्रुपचे सचिव मा. अनिलराव कदम यांच्या नेतृत्वात तसेच मा.मीडिया ग्रुपच्या महिला प्रदेशाध्यक्षा मा.कांचनताई जांबोटी (नाईक), उपाध्यक्ष एम.डी. चव्हाण, कार्याध्यक्ष तानाजीराव जाधव, संस्थापक सदस्य ईश्वरजी हुलवान, ताजुद्दीनजी शेख, कुलभूषण महाजन, मधुकरजी गलांडे, राजेशजी जवंजाळ, संदीप बाजड, राज्य संपर्क प्रमुख आशुतोष इंगळे (गुरुजी), मंत्रालय प्रतिनिधी अजिंक्य गोवेकर, विदर्भाची खऱ्या अर्थाने ज्यांच्यावर जिम्मेदारी आहे असे मा.गजानन गवई, निलेश धाडीकर, ऋषीकेश वाघमारे यांच्यासह अन्य मीडिया ग्रुप कोअर कमिटीच्या सदस्यांनी एकमताने निर्णय घेऊन नागपूर विभागातील पत्रकार बांधवांची निवड जाहीर केली आहे. अशी माहिती राज्याचे संपर्क प्रमुख मा.श्री.आशुभाऊ इंगळे (गुरुजी) यांनी दिली आहे.​

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post