जाहिरात
इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी
देशात साखरेचे प्रचंड उत्पादन झाले आहे. साखरेचे दर कोसळल्याने ऊसाला दर मिळत नाही. भारताविरुद्ध अघोषित युध्द करणा-या पाकिस्तानची साखर आयात केली आहे.सदरची साखर पाकिस्तानी साखरेची लोहारा तालुक्यात विक्री थांबवावी.
जाहिरात
अन्यथा लोहारा तालुका मनसेच्या वतीने खळखटयाळ आंदोलन करुन पाकिस्तानी साखर वहातुक करणारे वाहन व साखर साठवलेले गोडावुन,दुकान ताब्यात घेऊन साखर मोफत वाटप करण्याचे जाहीर केले आहे.
याबाबत लोहारा तालुका मनसेच्या वतीने तहसीलदार शोभा पुजारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे.या निवेदनात म्हटले आहे की, या वर्षी देशात विक्रमी साखरेचे उत्पादन झाले आहे. बाजारपेठेत दिवसेंदिवस साखरेचे दर घसरत आहेत. परिणामी अनेक कारखाने ऊसाला एफ आर पी. प्रमाणे दर देत आहेत.
जाहिरात
यामुळे बळीराजा प्रचंड अडचणीत आहेत. दुसरीकडे भारताविरुद्ध अतिरेकी पाठवुन अघोषित युध्द करणा-या पाकिस्तानची साखर आयात करुन सिमेवरील देशबांधवांच्या दु:खावर मीठ चोळण्याचे काम करीत आहेत. देशातील शेतकऱ्यांना देशोधडीला लावुन पाकिस्तानी लोकांनाच मोठं करण्याचे पाप करीत आहे.
जाहिरात
पाकिस्तानची आयात केलेली साखर लोहारा तालुक्यात विक्री अथवा वाहतुक करणेस प्रतिबंध करावा. अन्यथा लोहाच्या मनसेच्या वतीने खळखटयाळ आंदोलन करुन पाकिस्तानी साखर वहातुक करणारे वाहन व साखर साठवलेले गोडावुन, दुकान ताब्यात घेऊन साखर मोफत वाटली जाईल. व यावेळी कांही कायदेशीर बाबी उद्भवल्यास त्याची जबाबदारी प्रशासनावर राहिल.
या निवेदनावर तालुकाध्यक्ष अतुल जाधव यांची सही आहे.यावेळी मनविचे तालुकाध्यक्ष विवेक बनसोडे, उपाध्यक्ष शिवानंद राठोड,आदित्य बन,वैभव वैरागकर, बालाजी साळुंके, बाबासाहेब सगर, शिवराम भारती, दत्तात्रय घाडगे आदी मनसैनिक उपस्थित होते.