मनोरमा


गालगागा गालगाला
     मधुमास

मी तुकाचा दास आहे 
तोच माझा ध्यास आहे 

नेटका संसार करणे
हीच माझी आस आहे 

वागणे माझे मराठी
बोलणे ही खास आहे 

भ्रष्ट  आहे  राजसत्ता
चाड पण कोणास नाही 

मी मराठी  माणसांचा
पाहिला वनवास  आहे 

चोर सत्तेला भुकेला 
वेंधळा हव्यास  आहे 

पांडुरंगाच्या कृपेने
चाललेला श्वास  आहे 

चंद्र भागे वाळवंटी
भक्तिचा मधुमास आहे 

या मराठी वारशाचा
विजयही हमखास आहे 

तुकाराम पाटील
पिंपरी पुणे१७

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post