28 जानेवारीला जिल्हाभर मुलांना पाजणार पोलीओ डोज
जिल्हा प्रशासन सज्ज
जिल्हा प्रशासन सज्ज
चंद्रपूर दि.18 जानेवारी- पल्स पोलीओ रोगाचे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने 1995 पासून पल्स पोलीओ लसीकरण मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहीमेअंतर्गत देशाची भावी पिढी असलेल्या पाच वर्षाच्या आतील सर्व बालकांना पोलिओ लसीकरण करावे. तसेच बल्लारपूर, भद्रावती, वरोरा व ब्रम्हपूरी तालुक्यामध्ये विशेष काळजी घेण्यात येवून संपूर्ण जिल्हयात कोणताही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी सचिन कलंत्रे यांनी दिले.चंद्रपूर जिल्हयात ग्रामीण भागात प्रत्येक गावात किमान एक या प्रमाणे 1986, शहरी भागात 163 व महानगरपालिका क्षेत्रात 130 असे एकूण 2282 लसीकरण केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या व्यतिरीक्त प्रवासात असलेल्या बालकांना, स्थलांतरीत होत असलेल्या बालकांना व निवासाची व्यवस्था नसलेल्या बालकांना पोलीओ लस मिळावी यासाठी ग्रामीण भागात 96, शहरी भागात 13 व महानगरपालिका क्षेत्रात 18 अशा एकूण 127 मोबाईल टिमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच टोल नाका, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन, यात्रास्थळे व गर्दीच्या ठिकाणी सुध्दा ग्रामीण, शहरी व महानगरपालिका क्षेत्रात 185 ट्राझिंट टिमव्दारे लसीकरणाची व्यवस्था केली आहे. आयपीआय मोहिमेमध्ये घरोघरी जावून लस पाजण्याकरीता 1088 ग्रामीण, 139 शहरी व 184 महानगरपालिका क्षेत्र अशा एकूण 1411 टिमची व्यवस्था केलेली आहे. या मोहिमेकरीता ग्रामीण भागात 4489, शहरी भागात 460 व महानगरपालिका क्षेत्रात 388 असे एकूण 5348 कर्मचा-याची नियुक्ती केली असून ग्रामीण भागाकरीता 397 व शहरी भागाकरीता 34 तर महानगरपालिका क्षेत्राकरीता 27 असे एकूण 449 पर्यवेक्षकांची नियुक्त करण्यात आली आहे. पल्स पोलिओ मोहिमेमध्ये रोटरी क्लब व जेसीस सारख्या सेवाभावी संस्थांनी स्वयंस्फूर्तपणे सहभाग घेत असून इतरही सेवाभावी संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले.तसेच ग्रामीण व शहरी भागातील बालवाडी, अंगणवाडी व नर्सरीमध्ये येणा-या लहान मुलांना लस देण्याचे आवाहन त्यांच्या पाल्यांना करावे असेही सांगण्यात आले. त्याचप्रमाणे बॅनर्स व पोस्टर्स व्दारे प्रत्येक गावांत जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
सदर पल्सपोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर, महापालिका आयुक्त संजय काकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार यांनी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात पल्स पोलिओ मोहिमेच्या अनुषंगाने जिल्हा समन्वय समितीची सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार, मनपाच्या नोडल अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, डॉ. मोहमद साजीद व इतर समिती सदस्य उपस्थित होते. 2018 ची पल्स पोलीओ लसीकरण मोहिमेची पहिली फेरी 28 जानेवारी 2018 रोजी व दुसरी फेरी 11 मार्च 2018 रोजी महानगरपालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्हाभरातील 0 ते 5 वयोगटातील मुलांना पोलीओ डोज पाजण्यात येणार आहे. त्यानंतर ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस घरोघरी जावून लस पाजण्यात येणार आहे.सदर पल्सपोलिओ लसीकरण मोहिम यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकारी आशुतोष सलील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक नियति ठाकर, महापालिका आयुक्त संजय काकडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.उमेश नावाडे व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.श्रीराम गोगुलवार यांनी नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.
