‘लोकराज्य’च्या विशेषांकामुळे पोलीस दलाची कामगिरी नागरिकांपर्यंत पोहचेल - जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील


वाशिम लोकराज्य’चा जानेवारी २०१८ चा ‘आपले पोलीस, आपली अस्मिता’ हा विशेषांक माहितीपूर्ण व संग्राह्य असून त्यामुळे पोलीस दलाची कामगिरी नागरिकांपर्यंत पोहचण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी आज येथे व्यक्त केली. ‘लोकराज्य’च्या विशेषांकाचे प्रकाशन करताना त्या बोलत होत्या.यावेळी कारंजाचे पोलीस उपअधीक्षक रत्नाकर नवले, मंगरूळपीरचे उपअधीक्षक सुधाकर यादव, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, तानाजी घोलप, राजू जाधव यांच्यासह जिल्ह्यातील पोलीस अधिकारी उपस्थित होते.श्रीमती पाटील म्हणाल्या की, ‘लोकराज्य’च्या या अंकात फोर्स वन, सायबर सेल, महामार्ग पोलीस दल आदी विविध पोलीस शाखांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सायबर सुरक्षिततेविषयी मार्गदर्शनपर लेखही समाविष्ट आहेत. त्यामुळे अंक संग्राह्य झाला आहे.यावेळी श्री. पवार यांनी ‘लोकराज्य’ विशेषांकाची माहिती दिली. हा अंक जिल्ह्यात सर्वत्र स्टॉलवर उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post