लोकराज्यच्या ‘पोलीस विशेषांकाचे’ पोलीस अधीक्षक यांच्या हस्ते लोकार्पण


अकोला : ‘आपले पोलीस आपली अस्मिता’ या लोकराज्यच्या अंकाचे लोकार्पण जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या हस्ते आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात करण्यात आले. यावेळी श्री. कलासागर म्हणाले की, पोलीस विभागामार्फत करण्यात आलेल्या कामगिरीवर आधारित जानेवारी, 2018 चा लोकराज्यचा दर्जेदार व वाचनीय असा अंक माहिती व जनसंपर्क महासंचालनालाच्यावतीने प्रकाशित करण्यात आला आहे. तसेच लोकराज्य अंकामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती असल्यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना उपयुक्त असा अंक असून प्रत्येकाने ‘लोकराज्य पोलीस विशेषांक’ अवश्य घ्यावा. यावेळी प्रभारी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी हबीब शेख, सुनील टोमे, छायाचित्रकार मुकुंद देशमुख, यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य हे मासिक शहरातील तसेच जिल्ह्यातील बुकस्टॉलवर उपलब्ध आहे. लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, अकोला येथे संपर्क साधावा. शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी लोकराज्य मासिक उपयुक्त असल्यामुळे विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी वार्षिक वर्गणी भरुन अंक प्राप्त करण्याचे आवाहन श्री. धोंगडे यांनी केले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post