माना परीसरात अवैध हातभटटी ची दारू गाळणा-या विरूध्द धडक कारवाई

मुर्तिजापूर (प्रतिनिधी ) माना पोलिसांनी  अवैध दारू भट्टीवर छापा टाकून   हजारो रूपयांंचा माल जप्त करण्यात आला.  माना पो.स्टे. परीसरात जिल्हा  पोलीस अधीक्षक वअप्पर पोलीस अधीक्षक अकोला व उप विभागीय पोलीस अधिकारी मुर्तिजापूर यांचे  मार्गदर्शनात विशेष पथक तयार करून आज दि.12-01-2018 रोजी सकाळी 03.00 वा.
पासुन गुप्त बातमीदार लावून अकोली जहाॅंगीर येथे प्रोव्हीषन रेड करून दोन रनिंग हातभटटीच्या व दोन हातभटटीची दारू विक्री करतांना धाडी करून  त्यात   अप. नं. 8/18 कलम 65 क,ड,फ,ई, महा.प्रो. अॅक्ट आरोपी दत्तु शंकर नोहरे वय 65 वर्शे रा.अकोली जहाॅंगीर जप्त माल दारू गाळण्याचे साहीत्य, मोहा माच असा एकुण 28,650/- रू तसेच   9/18  कलम 65 ई महा.प्रो. अॅक्ट मनोहरे वय  32 वर्ष रा. अकोली जहाॅंगीर जप्त माल 15 लीटर गावठी हा.भ.ची दारू कि. 1500 /- रू. आणि   अप.नं 10/18 कलम 65 ई महा. प्रो.अॅक्ट आरोपी राजकुमार अवधुत भगत वय 29 वर्षे  रा . अकोली जहाॅंगीर जप्त माल गावठी हा.भ.ची दारू 18 लीटर कि. 1800 /- रू. 4)  अप नं. 11 / 18 कलम 65 क,ड,फ,ई, महा. प्रो.अॅक्ट आरोपी अवधुत विष्वनाथ भगत वय 67 वर्शे रा. अकोली जहाॅंगीर जप्त माल दारू गाळण्याचे साहीत्य, मोहा माच असा एकुण 16,050 /- रू चा माल जप्त करण्यात आला.  चार कारवायांमध्ये एकुण 48,000 /- रू चा माल जप्त केला. वरील धाड सत्रात ठाणेदार बी.पी.घुगे, पो. उप.नि.श्रीकृष्ण पाटील, ना.पो.काॅ. नंदकिशोर टिकार, पोकाॅं संदिप पवार, विनोद तायडे, सचिन दुबे, मपोकाॅं वणिता चव्हाण, डाॅ. प्रवणि ठाकरे यांनी भाग घेतला.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post