जिल्हास्तर युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन


इकबाल मुल्ला
लोहारा/प्रतिनिधी :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांच्या मार्फत 10 दिवसांचे निवासी जिल्हा युवा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. 21 ते 30 मार्च रोजी श्री.तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम उस्मानाबाद येथे करण्यात आले आहे. हे शिबीर निवासी शिबीर आहे.
यामध्ये जीवन कौशल्य, रोजगार मार्गदर्शन, शासकीय योजना, कायदेविषयक माहिती, युवकांसाठी आरोग्य, समुपदेशन, भारताचा इतिहास, अर्थव्यवस्था, चालू घडामोडी, पर्यावरण व इतर अनुषंगीक विषयांचा समावेश आहे.
यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील इच्छुक प्रशिक्षणार्थींची नावे मागविण्यात येत आहेत.तरी नेहरू युवा केंद्र,राष्ट्रीय छात्र सेना,एनएसएस, जिल्हयातील युवा संस्था व शाळा महाविद्यालये यांनी त्यांच्याकडील इच्छुक प्रशिक्षणार्थींची सहभागी होण्यासाठी युवक व युवतींनी आपले नाव, जन्मदिनांक,पत्ता,मोबाईल नंबरसह त्वरीत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयास दिनांक 20 मार्च 2018 पर्यंत पाठवावे,असे जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक यांनी कळविले आहे.

SHARE THIS

Author:

Previous Post
Next Post