भंडारा, दि.18 :- 11 ते 17 जानेवारी 2018 या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित भंडारा व विद्युत निरिक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्युत सुरक्षा सप्ताह 2018 साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात 11 जानेवारी रोजी लाल बहादूर शास्त्री हायस्कुल ते विद्युत भवन भंडारा पर्यंत प्रभात फेरी काढून करण्यात आले. सदर प्रभात फेरीमध्ये हॅड बॅनर, पथनाटयाद्वारे विद्युत सुरक्षेबाबत जनमानसात जागृती करण्यात आली. सदर सप्ताहामध्ये विद्युत सुरक्षेबाबतचे महत्व व विद्युत अपघात टाळण्याकरीता घ्यावयाची काळजी याबाबत जनजागृती करण्यात आली.
विद्युत सप्ताहाचा समारोप 17 जानेवारी 2018 रोजी सामाजिक न्याय भवन सभागृह येथे विद्युत सुरक्षेवर परिसंवादाद्वारे व कार्यशाळेद्वारे पार पाडण्यात आले.सदर समारोपीय कार्यक्रमाचे उदघाटन नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमास नागपूरचे मुख्य अभियंता सुहास रंगारी, उप वनसंरक्षक विवेक होशिंग, प्रभारी मुख्य अभियंता महावितरण गोंदिया लिलाधर बोरीकर उपस्थित होते.सदर परिसंवादाचे प्रास्ताविक अधिक्षक अभियंता सुरेश मडावी यांनी केले. विवेक होशिंग यांनी वन्य प्राण्यांची होणारी शिकार व परिणाम या विषयावर मार्गदर्शन केले. नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी अपघात कमी करण्याबाबत घ्यावयाची सुरक्षा याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले. सुहास रंगारी यांनी सुरक्षा साधनाचा उपयोग करुन आपघात टाळण्याबाबत मार्गदर्शन केले. घरगुती सुरक्षा व अपघात टाळण्याबाबत प्रभारी मुख्य अभियंता लिलाधर बोरीकर यांनी मार्गदर्शन केले. मे. अशोक लेलँड भंडारा कडून लाभलेले जोशी यांनी परिसंवादात मार्गदर्शन केले. इंडस्ट्रीयल असोसिएशन भंडाराचे अधिक्षक झंवर यांनी सुरक्षिततेच्या विषयावर परिकल्पना मांडली. आरोग्य विभागाचे डॉ. विवेक सतदेवे यांनी अपघातानंतर प्राथमिक उपचार या विषयावर प्रकाश टाकला आणि विद्युत निरिक्षक उदयकुमार भोयर यांची संच मांडणीच्या सुरक्षेबाबत विस्तृत माहिती देवून कार्यक्रमाचा उत्साह वाढविला.जनतेच्या जागृतीसाठी पथनाटय प्रस्तृत करणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धम्मदिप फुलझेले यांनी आपल्या चमूसोबत सादरीकरण केले. विद्युत सुरक्षा सप्ताह 2018 अधिक्षक अभियंता सुरेश मडावी व विद्युत निरिक्षक उदयकुमार भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.